मोठी बातमी : परमबीर सिंह यांच्याविरुद्धचे गुन्हे सीबीआयकडे वर्ग करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले 5 गुन्हे निष्पक्ष तपासासाठी सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालने राज्य पोलिसांना आठवडाभरात प्रकरणे सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आणि सर्व अधिकाऱ्यांना सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुढील एफआयआर दाखल करायची असल्यास ती सीबीआयकडे हस्तांतरित केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.