मोदींच्या बायोपीक प्रदर्शनावरील बंदीबाबत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

pm-narendra-modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चरित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने 19 मे पर्यंत घातलेल्या बंदीबाबत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या चरित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेल्या बंदिविरोधात न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सुरुवातीला ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट 11 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे या चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना आयोगाने आचारसंहीता लागू असेपर्यंत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखले आहे.