नीट-यूजीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत 0.001 टक्केही चूक किंवा निष्काळजीपणा चालणार नाही. झाल्यास त्यावर पूर्णपणे कारवाई झालीच पाहिजे. मुलांनी परीक्षेसाठी केलेल्या जीवतोड मेहनतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि पेंद्र सरकारला फटकारले. नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेस मार्कांसह पेपरफुटी आणि विविध तक्रारींसंबधीच्या दोन वेगवेगळय़ा याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परीक्षा 5 मे रोजी पार पडली होती.