डोकॅलिटी! पीपीई किटचा असा भन्नाट वापर तुम्ही पाहिला नसेल, फोटो व्हायरल

कोरोना युद्धात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांसोबत स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट चिलखताचे काम करत आहे. परंतु आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची काही कमतरता नाही.

कोरोना काळात जुगाडचे अनेक व्हिडीओ, फोटोही व्हायरल झाले होते. आताही एक असाच फोटो व्हायरल होत आहे. यात पाखरांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने चक्क शेतामध्ये पीपीई किट लावल्या आहेत. सोशल मीडियावर याचा फोटो व्हायरल होत असून असा भन्नाट जुगाड तुम्ही कुठे पाहिला नसेल.

ट्विटरवर @Raviclick नावाच्या एका युजरने हे फोटो शेअर केले आहेत. ‘कोरोना महामारीनंतर हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्ल्यूपासून वाचण्यासाठी बुजगावण्याला पीपीई किट घालण्यात आली’, असे कॅप्शन या फोटोसोबत देण्यात आले आहे. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय.

यावर अनेक युजर्सने रिप्लाय दिला आहे. आम्ही कोणतीही गोष्ट वाया जाऊ देत नाही, असे नेटकरी म्हणताहेत. तसेच अनेकांनी या आयडीयाच्या कल्पनेला सलाम ठोकला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या