अनुसूचित जाती – जमाती वर्गीकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर रविवारी जाहीर चर्चा 

अनुसूचित जाती – जमातीचे उपवर्गीकरण करून आरक्षणाचे धोरण ठरवावे असा निर्णय 1 ऑगस्ट रोजी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन कलह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या निर्णयाचे दुरगामी परिणामही होऊ शकतात. हा निर्णय समजून घेऊन व त्याबाबत काय कारवाई करता येईल याबाबत जाहीर चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्पृतिक पेंद्राच्या वतीने विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित हा कार्यक्रम 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता पेंद्राच्या सम्राट अशोका सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, लोखंडवाला रोड अंधेरी (प) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. सुरेश माने, मधू कांबळे  उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पेंद्राचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी दिली.