शिष्यवृत्ती परीक्षेत फाटक हायस्कूलचे 37 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक इयत्ता पाचवीच्या परीक्षेत व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवीच्या परीक्षेत शहरी विभागात फाटक हायस्कूलच्या 15 व 22 अशा 37 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ही परीक्षा 24 फेब्रुवारी रोजी झाली होती. पाचवीच्या परीक्षेत फाटक हायस्कूलच्या मिहीका परांजपे हिने 288 गुणांसह राज्य गुणवत्ता यादीत शहरी विभागात तिसरा व जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. आठवीच्या शिष्यवृत्तीत शहरी विभागातून याच शाळेच्या शिवम कीरने राज्यात नववा, वेदांत भट याने 15 वा आणि मृदूला बनगर हिने 17 वा क्रमांक मिळवला. पाचवीत फाटक हायस्कूलच्या 15 व आठवीतील 22 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. सौ. सुमिता भावे आणि सर्व पदाधिकार्‍यांनी मुख्याध्यापिका सौ. शुभांगी वायकूळ आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

पाचवी शिष्यवृत्तीमधील गुणवंत
मिहीका परांजपे (288, 1) तिर्था सावंत (262, 5), हर्ष पाटील (244, 23), हृषीकेश कोतवडेकर (242, 26), रुद्र शिवलकर (238, 32), आदित्य भिडे (236, 34), वीणा काळे (234, 38), अर्जुन साळवी (232, 41), मुक्ता जोशी (232, 42), सई अवसरे (230, 50), मानस पालकर (224, 60), वरद आरेकर (216, 74), हर्षाली चाळके (206, 101), अनुष्का म्हाबदी (202, 109), पार्थ देसाई (202, 111).

आठवी शिष्यवृत्तीमधील गुणवंत
शिवम कीर (266 1), वेदांत भट (260, 3), मृदूला बनगर (258, 5), आदित्य सोहोनी (252, 8), सोहिनी जोगळेकर (250, 10), आदित्य पाटील (246, 12), गायत्री दामले (240, 14), पृथा ठाकूर (238, 17), कल्याणी केळकर (238, 18), इरा शिंदे (234, 23), वेदांग भिडे (224, 28), तनया घाणेकर (222, 34), वेदिका भागवत (220, 39), सार्थक आठवले (216, 41), मिताली नागले (212, 46), ऋतूजा बिर्‍हाडे (210, 48), रुपेश देवळेकर (206, 53), वरद भावे (206, 54), सानिका घोसाळकर (194, 82), स्वयम डाफळे (188, 94), श्रेया मंडले (188, 95), प्रणव साठे (188, 96).