
शाळेत मुलीला मारले म्हणून शिक्षकांना जाब विचारायला गेलेल्या पालकांवर त्या शिक्षकाने थेट चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश बाराबंकी येथे घडली. या प्रकारानंतर पालकांनी कसेबसे आपले प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप शिक्षकावर कारवाई न केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
उच्च प्राथमिक विद्यालय, टिकुरहुवा येथील शिक्षकाने विद्यार्थिनीला खूप निर्दयपणे मारले. त्याचा जाब विचारायला तिचे पालक शाळेत गेले. त्यामुळे शिक्षकाने संतापून शिवीगाळ केली व चाकू काढला. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी पळून जाऊन आपला जीव वाचवला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी चाकूबाज शिक्षकाला कसेबसे आवरले. या घटनेनंतर पालकांनी सुबेहा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.