गोरेगावमध्ये स्कूल व्हॅन पेटली

26

सामना ऑनलाईन । मुंबई

गोरेगावमध्ये शुक्रवारी दुपारी एका शाळेच्या व्हॅनने अचानक पेट घेतला. दोन विद्यार्थी आणि चालक यावेळी व्हॅनमध्ये होते. मात्र इंजिनमधून धूर येत असल्याचे कळताच चालक बाहेर आला आणि विद्यार्थ्यांनाही बाहेर काढले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. रायन इंटरनॅशनल स्कूलची ही व्हॅन असल्याचे म्हटले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या