चिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट उघडकीस

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, बार्टो

अमेरिकेतील बार्टो भागातल्या एका शाळेमध्ये भयंकर घटना सुदैवाने टळली आहे. 11 आणि 12 वर्षांच्या दोन विद्यार्थिनींनी त्यांच्या शाळेतील लहान मुलांना ठार मारून त्यातं रक्त पेल्यातून प्यायचं ठरवलं होतं. यासाठी त्यांनी शस्त्रंही जमा केली होती. ज्यामध्ये सुरा, पिझ्झा कटर, कात्री या हत्यारांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघीजण हा कट रचत होत्या. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार या दोघी सैतानपूजक होत्या आणि त्यासाठीच त्यांनी हा अघोरी कट रचला होता.

बार्टो मिडल स्कूनमधल्या एका शिक्षिकेला या दोघी बाथरूममध्ये हळू आवाजात बोलताना दिसल्या होत्या. शिक्षिकेने थोडं लपून त्या काय बोलतायत हे ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिक्षेकेला दोघींच्या कटाबद्दल कळालं. बाथरूमला येणाऱ्या छोट्या मुलींची त्या दोघी वाट पाहात होत्या. छोट्या मुली जास्त प्रतिकार करू शकणार नाही हे माहिती असल्यानं त्यांनी 4-5 वर्षाच्या मुलींना सावज बनवण्याचं ठरवलं होतं. या दोघींनी किमान १५ मुलींना ठार मारून त्यांचं रक्त प्यायचं ठरवलं होतं. रक्त प्यायल्यानंतर स्वत:ला संपवण्याचंही दोघींनी ठरवलं होतं. दोघींच्या घरी सापडलेल्या चिठ्ठीमुळे या बाबीचा खुलासा झाला आहे.