सहा महिन्यानंतर सुरू होणार कश्मीरमधील शाळा

422

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. सर्व शाळा महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली होती. आता तब्बल सहा महिन्यानंतर कश्मीरमधील शाळा सुरू होणार आहेत.

केंद्र सरकाराने गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात संचारबंधी लागू केली होती. त्यानंतर सरकारने 19 ऑगस्टला शाळा सुरू केल्या होत्या मात्र काही अघटित प्रकार घडू नये म्हणून पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन महिन्यांनी शाळांना हिवाळ्याची सुट्टी पडली होती. अखेर आता 24 फेब्रुवारीपासून शाळा सुरू होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या