हिंदुस्थानी अंतराळवीर चंद्रावर कधी आणि कसे पोहचणार; एस. सोमनाथ यांनी सांगितली ISRO ची योजना

चांद्रयान 3 च्या अभूतपूर्व यशामुळे देशातील अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोचे जगभरात नाव झाले. जगातील कोणत्याही देशाला जे जमले नव्हते, ते हिंदुस्थानने करून दाखवले आहे. त्यानंतर इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी आदित्य एल 1 हे यान आणि त्याचे यशही जगासमोर ठेवले आहे. आदित्यचा प्रवास त्याच्या अंतिम टप्प्यात असून ते जानेवारीत एल 1 कक्षेत पोहचणार आहे. आता ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी एक महत्त्वाचे सादरीकरण करत हिंदुस्थानी अंतराळवीर चंद्रावर कधी आणि कसे पोहचणार आहे, याबाबतच्या ISRO च्या योजनेची माहिती दिली आहे.

सोमनाथ यांनी ISG-ISRS नॅशनल सिम्पोजियममध्ये एक सादरीकरण केले. त्यात त्यांनी हिंदुस्थानी अंतराळवीर चंद्रावर कधी आणि कसे पोहचणार याची माहिती दिली. ‘स्पेस एक्स्प्लोरेशनः द एप्रोच एंड विजन इन अमृत काल’ या विषयावर सादरीकरण करत इस्रोच्या महत्त्वाच्या योजनेची माहिती दिली. हा कार्यक्रम विक्रम साराभाई मेमोरियल लेक्चरमधील 32वा भाग होता.

सोमनाथ यांनी सांगितले चंद्रावर अंतराळवीरांना पोहचण्यासाठी ह्यूमन रेटेड रॉकेट्स बनवावे लागतील. सध्या त्याचा वापर गगनयान मोहिमेत करण्यात येत आहे. या रॉकेट्ना
LVM3 रॉकेट असे म्हणातात. त्यानंतर त्यांना अद्यावत करत त्यात सेमी-क्रायो इंजन चालवावे लागतील. तसेच अद्ययावत पुढील मिशला यशस्वी करतील. रोबोट्सना चंद्रावरील आर्बिटचा प्रवास घडवण्यात येईल. त्यानंतर मानवाला चंद्रावरील आर्बिटमध्ये पाठवले जाईल. तसेच या कालावधीत इस्रो आपले अंतराळ स्थानकही स्थापन करणार आहे, असे सोमनाथ यांनी सांगितले.

या काळात चांद्रयानचे पुढील मिशन कार्यरत राहणार आहेत. यापुढील टप्पा हा डॉकिंग आणि रोबोट्सच्या प्रदर्शनाचा असेल. ते चंद्रावरील सँपल देशात आणतील. ही प्रदीर्घ काळ चालणारी मोहीम आहे. याचदरम्यान हिंदुस्थानी अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेलाही गती देण्यात येणार आहे. सुमारे 2035 पर्यंत हिंदुस्थानचे अंतराळ स्थानक असेल. ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालत राहणार आहे. त्यानंतर 2040 पर्यंत इस्रो आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. या मोहिमेत रॉकेट, लँडर आणि रोवर सर्व स्वदेशी बनावटीचे असेल, असे आमचे ध्येय आहे.

ISRO ची अशी योजना आहे की, 2025 मध्ये गगनयान मोहिमेद्वारे आपल्या अंतराळावीरांना अंतराळात पाठवणार आहे. पहिल्यांदाच अंतराळवीर गगनयानाद्वारे पृथ्वीच्या लोअर अर्थ ऑर्बिटला प्रदक्षिणा करणार आहेत. त्यानंतर अंतराळ स्थानकाच्या उभारणीला वेग येणार आहे. 2030 च्या दशकात देशाचे 20 टनचे अंतराळ स्थानक पृथ्वीपासून 400 किलोमीटरवर स्थापन करण्यात येणार आहे. या स्थानकात अंतराळवीर 15 ते 20 दिवस राहू शकणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या अंतराळ स्थानकाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त अंतराळवीर त्यात राहू शकतील आणि आमच्या मोहिमेला यश मिळणार आहे, असे सोमनाथ यांनी सांगितले.

ISROच्या यशाने प्रभावीत होत अमेरिकेच्या नासासह जगातील अनेक अतंराळ संस्था हिंदुस्थानच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हिंदुस्थानने अमेरिकेसह आर्टेमिस एकॉर्डवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे आपल्या अंतराळ मोहिमांना यश मिळणार आहे. नासाचे प्रशासक बिल नेस्लन यांनी सांगितले की, पुढील वर्षात हिंदुस्थानी अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी नास आणि इस्रोमध्ये करार होणार आहे.