‘इस कॉन्क्रीट में जान है’; संशोधकांनी शोधले भेगा भरणारे कॉन्क्रीट!

818

भिंतींना भेगा पडल्यास किंवा तडे गेल्यास सिमेंट ,रेती आणि लांबी यांचे मिश्रण करून या भेगा बुजवाव्या लागतात. तसेच घरातील भेगा आणि तडे जास्त असल्यास त्यात कॉन्क्रीट भरावे लागते. तसेच प्रत्येक बांधकामात कॉन्क्रीटचा वापर होतो. मात्र, आता संशोधकांनी असे कॉन्क्रीट शोधले आहे, जे भिंतीना पडलेल्या भेगा आणि तडे स्वतःच भरणार आहे. संशोधकांनी या कॉन्क्रीटला ‘जिवंत कॉन्क्रीट’ असे नाव दिले आहे. त्यामुळे ‘इस कॉन्क्रीट में जान है’ असे संशोधक म्हणत आहेत.

भिंतीला तडे गेल्यास हे कॉन्क्रीट आपोआप प्रसरण पावणार आहे आणि ते तडे भरले जाणार आहेत, असे संशोधकांनी सांगितले. उजेड, सूर्यप्रकाश आणि पाण्यामुळे हे कॉन्क्रीट स्वतःच प्रसरण पावणार आहे. अमेरिकेच्या बोल्डरमधील कोलोराडो विद्यापीठातील वैज्ञानिक डॉ. विल स्नूबर आणि त्यांच्या पथकाने या कॉन्क्रीटचा शोध लावला आहे. हे कॉन्क्रीट बनवताना रेती, सिमेंट आणि पाण्यासोबत विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया मिसळण्यात येतात. उजेड, सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या मदतीने हे बॅक्टेरिया विकसीत होऊन प्रसरण पावतात. त्यामुळे भिंतीतील तडे सहज भरले जातात. फोटोसिंथसिस प्रक्रियेने स्वतःला विकसीत करणाऱ्या या बॅक्टेरियाला सायनोबॅक्टेरिया म्हणातात. या बॅक्टेरियामध्ये रेती, सिमेंट आणि पाणी टाकण्यात येते. त्यामुळे बनणारे कॉन्क्रीट कमी प्रमाणात कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन करतात असे वैज्ञानिकांनी सांगितले. तसेच हे कॉन्क्रीट डिझायनर असून कोणत्याही साच्यात आणि आकारात ते बनवता येतात, असेही वैज्ञानिकांनी सांगितले.

हे कॉन्क्रीट अधिक मजबूत करण्यासाठी या मिश्रणात जिलेटिन हे बॅक्टेरियाचे पोषणतत्वही मिसळण्यात येते. त्यामुळे अधिक जलद आणि मजबूत कॉन्क्रीट बनते, असे डॉ. विल स्नूबर यांनी सांगितले. या कॉन्क्रीटपासून वैज्ञानिकांनी 2 इंचाचे बॉक्स बनवले आहेत. तसेच वेगवेगळ्या आकाराच्या साच्यात टाकूनही कॉन्क्रीटच्या विविध वीटा बनवण्यात आल्या आहेत. त्यांच्या मजबुतीची चाचणी करण्यासाठी वैज्ञानिकांनी विविध प्रयोग केले. उंचीवरून पडल्यानंतरही किंवा या वीटांवर वजन टाकल्यानंतरही त्या तुटल्या नाहीत असे संशोधकांनी सांगितले. या वीटा आकाराने लहान असल्या तरी यापासून घर बनवता येऊ शकते, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. यापासून भिंत बांधल्यास सुरुवातील हे बॅटेरिया थंडावतात. मात्र, घरातील उजेड, सूर्यप्रकाश आणि पाणी मिळाल्यावर त्यांचे काम सुरू होते. तसेच तीन वीटांपासून नऊ वीटा बनतात. अशाप्रकारे त्यांचे प्रसरण होते. भविष्यात या कॉन्क्रीटला प्लॅस्टिक आणि काचाही जोडण्यात येऊ शकतात, असेही संशोधकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या