या दोन ग्रहांवर पडतो हिऱ्यांचा पाऊस

47

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

मुसळधार  पावसामुळे जगात ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. याचा अनुभव सर्वांनीच घेतलेला असेल, पण सौरमालेतील दोन ग्रहांवर चक्क हिऱ्यांचा पाऊस पडतो. नेपचून आणि युरेनस या ग्रहांवर काही दिवसांपासून हिऱ्यांचा पाऊस पडत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या दोन्ही ग्रहांवरील वातावरणात हवेचा दाब वाढला असून हायड्रोजन आणि कार्बन यांच्यातील संपर्क तुटला आहे. त्यामुळे या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस पडत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या