स्वदेशी बनावटीची ‘करंज’ पाणबुडी नौदलात दाखल

55

सामना ऑनलाईन, मुंबई

हिंदुस्थानी नौदलाच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. स्वदेशी बनावटीच्या ‘करंज’ या स्कॉर्पियन वर्गातील पाणबुडीचा नौदलात समावेश झाला. शत्रूच्या रडारलाही हुलकावणी देऊन लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास ही पाणबुडी सक्षम आहे. नौदलप्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘करंज’चे जलावतरण झाले.

माझगाव डॉकमध्ये ‘करंज’ची निर्मिती झाली. ६७.५ मीटर लांब आणि १२.३ मीटर उंची असलेल्या या पाणबुडीचे वजन १५६५ टन आहे. गेल्या वर्षी ‘खांदेरी’ आणि ‘कलवरी’ या दोन स्कॉर्पियन पाणबुडय़ा नौदलात सामील केल्या गेल्या. या दोन्ही पाणबुडय़ांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.

‘करंज’ची वैशिष्टय़े…

  • टॉरपीडो आणि जहाजरोधी क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यास सक्षम.
  •  पाण्यावर तसेच पाण्याखालूनही शत्रूवर हल्ला करू शकते.
  •  कोणत्याही युद्धात वापर होऊ शकतो.
  •  बराच काळ समुद्राखाली राहू शकते.
  •  हेरगिरीसाठीही उपयुक्त.
आपली प्रतिक्रिया द्या