वृश्चिक

4088

‘‘पृथ्वी व आकाश यांना जोडणारा चैतन्यमयी दुवा म्हणजे वृक्ष होय. जनता व नेता (राजा) यांच्यामधील सौजन्यशील दुवा म्हणजे नेत्याच्या ठाई असलेला सद्गुण व आत्मविश्वास होय.’’

आत्मविश्वासाने व नव्या प्रेरणेने दिवाळी साजरी कराल. दिवाळीचे सुरुवातीचे दिवस तुमचा उत्साह ओसंडून वाहील. नरकचतुर्दशीनंतर अचानक एखादा संभ्रम मन पोखरेल. एखादी खंत वाटेल. दिवाळी पाडवा उदास राहाल. भाऊबीजेच्या दिवशी तुमचे मन स्वच्छ प्रकाशाकडे धाव घेईल. उमेद वाढेल. नवा कार्यारंभ करता येईल. साडेसातीचा कालावधी सुरू आहे. वर्षभर कन्या राशीत म्हणजे वृश्चिकेच्या एकादशात गुरू महाराज राहतील. अपेक्षापूर्ती होईल. २६ जानेवारी २०१७ धनु राशीत शनि महाराज प्रवेश करतील. वृश्चिक राशीचा साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होईल. २० जून ते २५ ऑक्टोबरमध्ये शनि वक्री होऊन वृश्चिकेत येईल. २६ ऑक्टोबर २०१७ला शनी मार्गी होईल म्हणजे धनुराशीत पुन्हा येईल. तुमची जिद्द तुम्हाला प्रगतीचा नवा मार्ग दाखवणार आहे. कर्क राशीत १८ ऑगस्ट २०१७ राहू व मकर राशीत केतू प्रवेश करीत आहे.
राहू, केतूच्या राश्यांनंतरचा तुमच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होणार नाही. गुप्त कारवाया करणारे लोक मैत्रीसाठी येतील. तुमच्या मताशी सहमत होतील. १२ सप्टेंबर २०१७ गुरू महाराज तुळेत प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा तुमच्या क्षेत्रात उतरेल. नोकरी-व्यवसाय यात उच्चपद मिळेल. आर्थिक लाभ होईल. परदेश प्रवास होईल. थोरामोठय़ांचा परिचय फायदेशीर व उत्साहवर्धक ठरेल. वेगळय़ाच प्रकारची कलाटणी तुमच्या कार्याला या वर्षात मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात चमकाल. तुमच्या योजना मात्र वेगाने पूर्ण करा. चांगला कालावधी ग्रहांची साथ असते तेव्हाच असतो. प्रयत्न हे सर्वात महत्त्वाचे ठरतात तेव्हा न डगमगता यशाची उंची गाठा. मुद्देसूद भविष्य पाहूया.

राजकीय-सामाजिक क्षेत्र:

साडेसाती चालू असली तरी तुमचे कार्य आत्मविश्वासाने करता येईल. योग्य मांडणी करा, योजना तयार करा व पद्धतशीरपणे कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ग्रहांची साथ आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करा. लोकांच्या भेटीत, दौऱयात यश मिळेल. सर्व स्तरातील लोकांसाठी कार्य करणे, नेत्याला व समाजसेवकाला महत्त्वाचे असते. जाने., मार्च व मेमध्ये मोठय़ा अडचणीवर मात करून तुम्ही प्रतिष्ठा मिळवाल. आर्थिक मदत सामाजिक कार्यासाठी मिळवता येईल. डिसें, मे व जुलैमध्ये मनस्ताप होईल. मार्च व मे मध्ये प्रवासात सावध राहा. शारीरिक धोका संभवतो. वाद व तणाव वाढेल. कोर्टकेसमध्ये या काळात सावध राहिल्यास धोका टाळता येईल. दर्जेदार परिचय होतील व पदाधिकार सांभाळावा लागेल. वेळच्या वेळी काम केल्यास जादा काम होईल व नावलौकिक वाढेल.

नोकरी-व्यवसाय:

शेतकरीवर्गाला नव्या पद्धतीने नव्या विचाराने प्रगती करता येईल. या वर्षात जास्तीत जास्त जम तुम्ही तुमच्या क्षेत्रात बसवा. मागील नुकसान भरून काढण्याची संधी मिळेल. भविष्याची तरतूद करून ठेवता येईल. नोकरीत मनाप्रमाणे बदल व उत्कर्ष होईल. कंपनीद्वारे परदेशी जाण्याचा योग जाने., फेब्रु. व मे मध्ये येईल. धंद्याचा जास्त विस्तार करता येईल. स्वतः कष्ट घेतल्याशिवाय व्यवसाय वाढत नाही. त्यामुळे संधीचा फायदा घ्या. ग्रहांची साथ आहे, प्रयत्न करा व विशेष यश मिळवा. व्यवसायात नावलौकिक मिळेल. मार्च व मे मध्ये वाद होईल, संयम ठेवा. रागामुळे चांगले काम फिसकटण्याची शक्यता आहे. जमीन-घर, खरेदी-विक्रीत लाभ होईल. स्वतःच नवा व्यवसाय सुरू करण्यास दिवाळीपासून सुरुवात करता येईल.

विद्यार्थी व तरुण वर्गासाठी:

विद्यार्थीवर्गाला तुम्ही निवडलेल्या अभ्यासक्रमात चांगले यश मिळवता येईल. बुद्धी चांगल्या कामासाठी वापरा. विषय तुम्हाला पटकन कळतो. परंतु त्याचे चिंतन व मनन केल्यास अधिक चकाकते यश तुम्ही मिळवू शकाल. संशोधन कार्यात यश मिळेल. तरुणवर्गाला लग्नासाठी स्थळे येतील. ऑक्टो. नोव्हे.च्या परीक्षेत जास्त अभ्यास करा. जाने., मार्चमध्ये चांगले यश मिळेल. जूनमध्ये वाद होईल. जुलैमध्ये प्रेमात तणाव होईल. मार्च व मेमध्ये वाहन जपून चालवा. योग्य व्यक्तीबरोबर तुमचे मनोगत व्यक्त करा.

महिलावर्ग:

कौटुंबिक समस्या सोडवण्यात यश मिळेल. तुमच्या व्यवसायात, नोकरीत प्रगती होईल. प्रकृती सुधारेल. आपल्या मुलांच्यावर प्रेम करणे म्हणजे त्यांचे फक्त लाड करणे असे नसून त्यांच्या चुका पोटात न घालता त्यांना त्यांची जाणीव करून देणे हे फार महत्त्वाचे असते तरच मुलांची दिशाभूल टळते. मार्च, मेमध्ये दडपण येईल. नवीन घर, वाहन खरेदी होऊ शकेल. आप्तेष्ट, तीक्र इ. संबंध सुधारतील. मान-सन्मानाचा योग येईल. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मनाप्रमाणे काम करून प्रसिद्धी व पैसा मिळवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या