समुद्रकिनारी दिसला विचित्र हिरवा प्राणी, व्यक्तिने केला ‘एलियन’ असल्याचा दावा

स्कॉटलंडमधील समुद्रकिनारी फिरत असताना एक परदेशी प्राणी पाहिल्याचा दाव एका व्यक्तिने केला आहे. त्याला सुरुवातीला तो फळांचा तुकडा असल्याचे वाटले, पण त्याचे प्राण्याचे चिमुकले पाय जेव्हा त्या व्यक्तिने पाहिले तेव्हा त्याला  आश्चर्याचा धक्काच बसला.

माइक आर्नोट (33) असे या व्यक्तिचे नाव आहे. तो स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्गमधील पोर्टोबेलो समुद्रकिनारी सोमवारी फिरायला गेलेला असताना त्याला किनाऱ्यावरील वाळवंटात हिरव्या रंगाचा विचित्र समुद्री जीव दिसला. त्याचे त्याच्याकडे गेले त्या क्षणी तो जीव म्हणजे झाकलेला अननसाचा तुकडा आहे, असेच त्याला वाटले; पण जवळून पाहिल्यावर तो चक्क ‘एलियन’ असल्याचा दावा माइक आर्नोटने केला आहे.

या वैशिष्ट्यपूर्ण समुद्री जीवाविषयी माइक आर्नोट सांगतो की, सोमवारी हा जीव मला समुद्रकिनारी दिसला. तो हिरव्या रंगाचा असून झाकलेल्या अननसाचा तुकडा असावा असेच वाटले, कारण त्याचा बाहेरचा भाग सुईप्रमाणे काटेरी दिसत होता. उत्सुकतेपोटी त्याच्या जवळ जाऊन बघितले तेव्हा त्याच्या शरीराच्या आतील भागावर अगदी छोटे छोटे पाय बघून आश्चर्याचा धक्काच बसला. तेव्हा खात्री झाली की, तो कोणत्याही फळाचा तुकडा नसून एक जिवंत जीव होता. त्याचा हिरवा रंग आणि अनोख्या रुपामुळे तो एलियनसारखा दिसत होता. माइकने अनोख्या समुद्री जीवाचे फोटो काढून सोशल मिडियावर शेअर केले. या फोटोखाली त्याने कॅप्शन दिले होते, ‘स्कॉटिश समुद्रकिनारी गडद हिरव्या रंगाचा समुद्री जीव सापडला.’