समलैंगिकांमुळे पसरतोय कोरोना, नेत्याचा अजब दावा

जगभरात सर्वच देशांमध्ये कोरोना पसरलाय. त्यामुळे अनेक देशात लॉकडाऊन सुरू आहे. तर काही देशात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोना झपाट्याने पसरत असल्याने जगभरासाठी ही चिंतेची बाब बनली आहे. याचा प्रसार कसा रोखायचा याबाबत सर्व देश चर्चा करत आहेत. दरम्यान स्कॉटलँडच्या एका नेत्याने कोरोनाच्या प्रसाराबाबत एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ‘समलैंगिकांमुळे कोरोनाचा प्रसार होतो’ असे त्या नेत्याचे म्हणने आहे.

पीटर टेट असे त्या नेत्याचे नाव आहे. स्कॉटलंडमध्ये लवकरच लोकसभा निवडणूका होणार आहेत. त्या निवडणूकीत टेट हा शेटलँड मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे. प्रचारादरम्यान शेटलँड टाईम्स या स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. हा दावा केल्यानंतर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

टेट हे समलैंगिक लग्नाचे कट्टर विरोधक आहेत. यामुलाखतीत त्यांना त्याबाबत विचारले असता त्यांनी कोरोना हा कदाचित यांच्यामुळेच पसरत असल्याचे म्हटले आहे, त्यांच्या या दाव्यामुळे LGBTQ समाजामधून संतप्त प्रतिक्रीया येत आहेत. टेट यांना या समाजातील लोकांनी मूर्ख म्हटले आहे. तसेच ट्विटरवर देखील त्यांच्याविरोधात ट्रेंड सुरू झाले आहे. टेट यांनी LGBTQ समाजाची माफी मागावी अशी मागणी करण्यात य़ेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या