दंडातून वाचण्यासाठी महिलेची शक्कल, वाचा सविस्तर

3263

एका महिलेच्या गाडीच्या काचांवर काळ्या रंगाची फिल्म लावलेली होती. त्यावेळी दंड भरण्याऐवजी त्यातून सुटण्यासाठी शक्कल लढवली. त्याच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाहतूक विभागाच्या नियमांनुसार गाडींच्या काचेवर कोणत्याही प्रकारची फिल्म लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घाल्याण्यासाठी आरटीओ मार्फत या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली होती.

सूरतच्या सलाबतपुरा येथील एका महिलेच्या गाडीच्या काचेवर काळ्या रंगाची फिल्म लावलेली होती. आरटीओ पोलिसांच्या नजरेत आले की, या महिलेच्या गाडीच्या काचेवर काळ्या रंगाची फिल्म लावलेली आहे. तेव्हा पोलिसांनी त्या महिलेच्या गाडीला थांबले आणि दंड भरावे लागेल, असे सांगण्यात आले. त्या नंतर त्या महिलेने पोलिसांशी वाद घालात शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरू केले. या सर्व घटनेचे तेथे उपस्थित लोक व्हिडीओ काढत आहेत हे त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्या महिलेने बेशुद्द पडण्याचे नाटक केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच दंड वाचवण्यासाठी या महिलेने केलेले नाटक पाहून नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

वाहतूक विभागाच्या नियमांनुसार गाडीच्या काचा या पारदर्शीच असल्या पाहिजे, त्यावर कोणत्या ही प्रकारची फिल्म नसता कामा नये. अशा प्रकारची फिल्म आढळल्यास दंड आकारण्यात येईल, असे हा कायदा सांगतो. गैरप्रकार रोखण्यासाठी म्हणून हा नियन करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या