अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडला विचित्र समुद्री जीव

37

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

कॅलिफोर्नियामध्ये मलिबू येथे लिओ कॅरिलो समुद्रकिनाऱ्यावर एक विचित्र समुद्री जीव वाहत आला आहे. डोळे आणि तोंडच नसलेल्या या समुद्री प्राण्याच्या शरीराच्या टोकावर दोन मोठ्या गाठी आहेत. या प्राण्याचे वजन ३.२ किलोग्राम एवढे असून रुंदी १३ सेंटीमीटर आहे. या प्राण्याचा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करण्यात आला असून त्याच्याबद्दल कोणास काही माहिती असेल तर सरकारी यंत्रणांना कळवावे असे सांगण्यात आले आहे.

त्यानंतर अनेकांनी अमेरिकेच्या समुद्रात आढळणारा हा दुर्मिळ समुद्री जीव असून त्याला समुद्री ससा म्हणून ओळखलं जात असल्याच सांगितल आहे. तसेच समुद्राच्या तळाशी मिळणाऱ्या लाल वनस्पती खात असल्याने या प्राण्याचा रंग लालसर असून त्याचे वजन ७ किलोपर्यत असते अशी  माहितीही काहीजणांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या