समुद्रामध्ये वसलेलं श्री निष्कलंक महादेव मंदिर

>> निळकंठ कुलकर्णी

गुजरातमधील भावनगरमध्ये कोलियाक तटातून तीन किलोमीटर आतमध्ये अरबी समुद्रामध्ये निष्कलंक महादेव मंदिर आहे. येथील अरबी समुद्रातील लाटा दररोज शिवलिंगाचा अभिषेक करतात. लोक पाण्यातून चालत जाऊन दर्शन घेतात. समुद्राच्या भरतीच्या वेळी तेथील मंदिराच्या केवळ पताका (ध्वज) आणि खांबच दिसतात. त्याला बघून कोणी अंदाज लावू शकत नाही की समुद्राच्या पाण्याखाली महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. असे येथे महादेवाची पाच शिवलिंगे आहेत.

कथा –

पांडवांना शिवलिंगाच्या रूपामध्ये भगवान शंकरांनी दर्शन दिले होते. या मंदिराचा इतिहास महाभारत काळापासून जोडला गेला आहे. महाभारतात पांडवांचे आणि कौरवांचे युद्ध झाले. पांडवांनी कौरवांना मारून युद्ध जिंकले. पण युद्ध समाप्तीनंतर पांडव हे ऐकून त्यांना खुप दुःख झाले. कारण आपल्या नातेवाईकांना मारून हत्या करायच पाप त्यांना लागलं. या पापातून मुक्त होण्यासाठी पांडव श्री कृष्णाला भेटले. पापातून मुक्त होण्यासाठी श्रीकृष्णांनी पांडवांना एक काळा ध्वज आणि काळी गाय त्यांच्या जवळ दिली आणि पांडवांना गायीच अनुसरण करायला सांगितलं. ते म्हणाले की, जेव्हा ध्वज आणि गाय दोघांचा रंग काळ्यावरून पांढरा होईल, तेव्हा समजून जा तुम्हला मुक्ती मिळेल. सोबत श्रीकृष्ण म्हणाले, ज्या जागेत असं होईल, तिथे भगवान शंकराची तपस्या करा. पाचही पांडव भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यानुसार काळा ध्वज हातात घेऊन आणि काळ्या गायीचं अनुसरण करायला लागले. यासाठी सर्व भाऊ वेगवेगळ्या जागेवर गेले. पण गायीचा आणि ध्वजाचा रंग बदलला नाही. मात्र, जेव्हा ते गुजरातमध्ये असलेल्या कोलियाक तटावर गेले तेव्हा गायीचा आणि ध्वजाचा रंग पांढरा झाला. याने पाच भाऊ खूप जास्त खुश झाले आणि तेथेच भगवान शिवाचं ध्यान करत तपश्चर्या करू लागले.

भगवान शंकरांनी त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन पाच भावांना शिवलिंगाच्या रुपात वेगवेगळे दर्शन दिले. ती पाच शिवलिंगे आता सुद्धा तेथे आहेत. पाचही शिवलिंगासमोर अजूनही नंदीची प्रतिमा आहे. पांचही शिवलिंग कोलियाक समुद्र किनाऱ्यापासून पूर्वेच्या बाजूला 3 किलोमीटर आतमध्ये अरबी समुद्रामध्ये आहेत. चबुतऱ्यामध्ये छोटासा पाण्याचा तलाव आहे. त्याला पांडव तलाव म्हटलं जातं. श्रद्धाळू आधी त्यामध्ये हात आणि पाय धुऊन घेतात त्यानंतर शिवलिंगाची पूजा अर्चना करतात. भाद्रपद महिन्यातील अमावास्येला तेथे भाद्रवी यात्रा भरते. येथे येऊन पांडवांना पापातून मुक्ती मिळाली यासाठी निष्कलंक महादेव असं म्हणतात.

प्रत्येक अमावास्येला या मंदिरामध्ये भक्तांनाची विशेष गर्दी असते. पौर्णिमा आणि अमावास्येला समुद्रामध्ये भरती अधिक असते, तरी सुद्धा भक्त मंडळी ती भरती कमी होण्याची वेळ बघत असतात आणि त्यानंतर भगवान शंकराचं दर्शन करतात. लोकांची अशी मान्यता आहे की आपल्या प्रियजन माणसाची राख जर शिवलिंगावर लावली आणि पाण्यामध्ये सोडून दिली की मोक्ष मिळतो त्याला तसेच मंदिरामध्ये भगवान शिवाला नारळ, राख तसेच दूध, दही दिलं जातं.

दरवर्षी प्रमाणे प्रमुख यात्रा ‘भाद्रवी ‘ भावनगरच्या महाराजा यांच्या वंशजांद्वारे मंदिराचा ध्वज फडकवला जातो. हा ध्वज मंदिरावर एक वर्षापर्यंत फडकवला जातो. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वर्षभर फडकवून ध्वजाचे जरा सुद्धा नुकसान होत नाही. तो जसा आहे तसाच राहतो. जर तुमची भगवान शंकरांवर श्रद्धा असेल तर स्वर्गापेक्षाही हे स्थान कमी नाही.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या