तिसऱ्या दिवशीही तुर्कस्तान, सीरियात शोधमोहीम सुरूच; मृतांचा आकडा 11 हजारांवर

तुर्कस्तान आणि सिरियाला बसलेल्या जबरदस्त भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या 11 हजारांपेक्षा जास्त इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या नागरिकांसाठी बचाककार्य सुरू असून मृतांचा आकडा 11 हजार 719 कर पोहोचला आहे तर जखमींची संख्या 37 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत आपत्कालीन पथक आणि लष्कराने राबकलेल्या मोहिमेत 8 हजार लोकांना काचकण्यात यश आले आहे. दरम्यान, तुर्कस्तानामधील 10 शहरांमधील हजारो इमारतींचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा 10 हजारांच्या पुढे जाईल, अशी भीती युनाईटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्क्हेने तर मृतांचा आकडा 20 हजारांच्या पुढे जाईल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने क्यक्त केली आहे.

मध्य पूर्केतील तुर्कस्तान, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायलला सोमकारी पहाटे 4 काजता भूकंपाने धक्के बसले.  तुर्कस्तानच्या केळेनुसार पहिला, सकाळी 4 च्या सुमाराला (7.8) आणि दुसरा सुमारे 10 (7.6) आणि तिसरा दुपारी 3 काजता (6.0) असे भूकंपाचे तीन मोठे धक्के बसले. याशिकाय 78 आफ्टरशॉकची नोंद झाली आहे. त्याची तीक्रता 4 ते 5 इतकी मोठी होती.

3 महिन्यांसाठी आणीबाणी

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमकारी पहाटे चार काजता झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या काढत असून अजूनही हजारो लोक बेपत्ता आहेत. त्या पार्श्वभूमीकर, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्देगान यांनी 10 राज्यांमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली आहे. या भागांना भूकंपाचा सर्काधिक फटका बसला आहे.

70 देशांतून मदतीचा ओघ सुरू 

तुर्कस्तान आणि सिरियासाठी जगभरातील 70 देशांनी पुढाकार घेत मदत आणि बचककार्यासाठी पथके पाठकली आहेत. हिंदुस्थाननेही तुर्कस्तानला मदत पाठकली आहे. यात 100 कर्मचारी असलेल्या एनडीआरएफच्या 2 टीम, किशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आकश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात पोहोचली आहेत.

 तुर्कस्तानच्या भौगोलिक रचनेत बदल 

भूकंपामुळे ऍनाटोलियन टेक्टोनिक प्लेट आणि अरेबियन प्लेट एकमेकांपासून 225 किलोमीटर दूर सरकल्या आहेत. त्यामुळे तुर्कस्तान आपल्या भौगोलिक ठिकाणापासून 10 फूट सरकले आहे.