हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना

सामना ऑनलाईन,कटक

हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना आज ओडिशातील कटक इथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात३५० धावा करूनही इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला होता. यावरून विराट कोहलीचा संघ किती फॉर्ममध्ये आहे याचा अंदाज येऊ शकतो. आजचा सामना हिंदुस्थानी संघाने जिंकला तर सामना विजयासोबतच मालिका विजयही विराटच्या संघाला साजरा करता येईल.

ms-dhoni-and-virat-kohli

कटकमधील बाराबती मैदानावर खेळताना एक मोठी अडचण दोन्ही संघांसमोर उभी राहणार आहे ती म्हणजे दवाची. संध्याकाळी साडेपाचनंतर दव पडायला सुरूवात होते. इथल्या परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला या फायदा होतो. या कारणामुळे नाणेफेक जिंकणं हे देखील एक आव्हान असणार आहे.

england-cricket-team

या मैदानावर शेवटचा सामना २०१४मध्ये श्रीलंकेविरूद्ध खेळवण्यात आला होता. पहिले फलंदाजी करताना हिंदुस्थानी संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३६३ धावांचा डोंगर उभा केला होता. हा सामना हिंदुस्थानी संघाने १६९ धावांनी जिंकला होता.

england-team-practice

पुण्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणाऱ्या शिखर धवनच्या पदरात अपयश पडलं होतं, त्यामुळे फिट झालेल्या अजिंक्य रहाणेची संघवापसी होऊन तो सलामीला येईल असं सांगण्यात येतंय. सलामीचे फलंदाज आणि कोहली,केदार जाधव वगळता मध्यक्रम ही हिंदुस्थानी संघासाठी थोडीशी चिंतेची बाब आहे. या सगळ्या परिस्थितीत आजचाही सामना हा जबरदस्त होण्याची शक्यता आहे.