
वन्य जीवांच्या जीवनशैलीवर आधारित ‘डायनेस्टीज’ या सीरिजचा दुसरा भाग सोनी बीबीसी अर्थ वाहिनीवर सुरू झाला आहे. सहा भागांची सीरिज विविध प्राणी आणि त्यांचे वंश, गुंतागुंतीची सामाजिक संरचना, वर्तन आणि अस्तित्व यावर प्रकाश टाकते. ‘डायनेस्टीज 2’मध्ये हत्ती व चित्ता यांना थक्क करणाऱया नाटय़मय आणि हृदयस्पर्शी कथा पाहायला मिळतील. तसेच प्राणी साम्राज्य, प्युमा आणि हायना यांच्या अनसंग हिरोंच्या कथादेखील आहेत. ‘डायनेस्टीज 2’ प्रेक्षकांना पॅटागोनियाचे अँडीज आणि झांबियाच्या प्रदेशांपासून माऊंट किलिमांजारोच्या सावलीत पसरलेल्या गवताळ प्रदेशापर्यंत घेऊन जाते.