‘शरारात’ मालिकेचा दुसरा भाग लवकरच येणार

51

सामना ऑनलाईन, मुंबई

‘शरारत’ या स्टार प्लसवरील प्रचंड गाजलेल्या विनोदी मालिकेचा दुसरा भाग लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेतील मुख्य कलाकार श्रुती सेठने ट्विटरवरुन हि माहिती दिली आहे. श्रुती व तिचे या मालिकेतील सहकलाकार करणवीर बोहरा आणि सिंपल कौल यांनी गुरुवारी एकत्र पार्टी केली. या पार्टीचे फोटो इंस्टाग्रामवरुन शेअर करत ‘शरारतच्या दुसऱया भागासाठी तयार होतोय’ अशी पोस्ट शेअर केली आहे.

शरारत या मालिकेत ज्येष्ट अभिनेत्री फरिदा जलाल, पुनम नरुला, महेश ठाकूर, श्रुती सेठ मुख्य भूमिकेत होते. यात फरिदा, पूनम व श्रुती या पऱ्या दाखवण्यात आल्या होत्या. या तिघींकडे असलेल्या शक्तींमुळे त्या कायम काही ना काही संकटात अडकत असतात. तब्बल पाच वर्षे चाललेली मालिका बरीच प्रसिद्ध झाली होती.  त्यामुळे ही मालिका परत येणार हे ऐकूणच या मालिकेचे चाहते खूष झाले असतील

आपली प्रतिक्रिया द्या