‘नदी वाहते’ चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित

62

सामना ऑनलाईन । मुंबई

‘श्वास’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘नदी वाहते’ हा आगामी मराठी चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

आताच्या काळात गावातली नदी वाहती ठेवणं हे जरी मोठं आव्हान असलं तरी त्यासाठी मेहनत करणे गरजेचं आहे. नदीसाठी केवळ मोर्चे काढून, आंदोलनं करून भागणार नाही. तर, नदीचा योग्य पद्धतीनं वापर करणं ही काळाची गरज आहे, या आशयसूत्रावर ‘नदी वाहते’ हा चित्रपट आधारित आहे.

संदीप सावंत आणि नीरजा पटवर्धन यांनी सहज फिल्म्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संजय मेमाणे यांनी छायांकन, नीरज व्होरालिया यांनी संकलन, कलादिग्दर्शन, वेशभूषा नीरजा पटवर्धन यांनी केलं आहे.

पाहा टीझर-

आपली प्रतिक्रिया द्या