आईच्या भावना कुणीच समजू शकत नाही, सांगतोय ‘मॉम’चा दुसरा ट्रेलर

46

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री श्रीदेवीच्या पुनरागमनानंतरचा दुसरा चित्रपट अशी चर्चा असलेल्या मॉम या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आईच्या भावना कोणीही समजू शकत नाही, अशा अर्थाचा असणारा हा ट्रेलर आईचा संघर्षही दाखवतो.

मॉम या चित्रपटात श्रीदेवीसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना यांच्याही भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग हिंदुस्थान आणि जॉर्जिया अशा दोन देशांमध्ये झालं आहे. बोनी कपूर निर्मित आणि रवी उद्यावर दिग्दर्शित मॉम हा चित्रपट १४ जुलै २०१७ला हिंदीसह तामीळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

पाहा मॉमचा हा दुसरा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या