उत्तर प्रदेशच्या सरकारी कार्यालयात कलम १४४ लागू

23

सामना ऑनलाईन । लखनऊ

उत्तर प्रदेशातील चकबंदी येथील एका सरकारी कार्यालयातच कलम १४४ लागू करण्याची वेळ आली आहे. चकबंदी येथील अधिकाऱयांनी सरकारी जमिनीवर बेकायदा अतिक्रमण केलेल्यांना हटवले होते. त्यात माजी मंत्री, खासदार आणि आमदारांचाही समावेश आहे. अतिक्रमण करणाऱयांना हटवल्यानंतर त्यांनी सरकारी अधिकारी, आयुक्त आणि मुख्य सचिव रजनीश दुबे यांनी धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर येथील कार्यालयात कलम १४४ लागू करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार सुमारे १०० कोटींची सरकारी जमीन भूमाफियांच्या कब्जातून सोडवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या