Video – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, मोदींच्या भेटीसाठी तरुण ताफ्यासमोर आला

कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. यावेळी एक तरुण सुरक्षा कवच तोडून मोदींच्या ताफ्या समोर धावत गेला. मात्र वेळीच सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. कर्नाटकमध्ये दुसऱ्यांदा मोदींच्या सुरक्षेत चूक झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. दावणगेरे येथे मोदींचा रोज शो सुरू असताना एक तरुण मोदींच्या ताफ्याच्या समोर येण्याचा प्रयत्न करत होता. मोदींच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले व पोलिसांच्या हवाली केले.

याआधी 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुबळी येथे आलेले असताना एक लहान मुलगा त्यांच्या गळ्यात हार घालण्यासाठी पुढे आला होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला ताफ्यातून बाजूला केले होते.