शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्या सुरक्षेला धोका, शिवसैनिकांची पोलिसांना निवेदने

शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पा बाबत घेतलेल्या भूमिकेनंतर बारसू व देवाचे गोठणे येथील काही ग्रामस्थांनी त्यांच्याविरोधात आंदोलन करुन त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली. आमदार राजन साळवी यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांची बदनामी केली जात आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदन आज रत्नागिरी आणि चिपळूण येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले

रत्नागिरी तालुक्याच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, जिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळूंखे, उपशहरप्रमुख श्रीकृष्ण चव्हाण, नितीन तळेकर, महिला शहर संघटक मनिषा बामणे आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्याविरोधात आंदोलन आणि त्यांची बदनामी सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत धोका निर्माण झाला आहे. त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. चिपळूण येथील शिवसैनिकांनीही चिपळूण पोलीस निरिक्षकांना निवेदन दिले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, तालुकाप्रमुख संदिप सावंत, तालुका युवाधिकारी उमेश खताते, तालुका सचिव संभाजी खेडेकर, उपशहर युवाधिकारी पार्थ जागुष्टे, युवासेना उपतालुकाप्रमुख अवधुत शिर्के, ऋषिकेश नलावडे, दीपक मोरे, विशाल ओसवाल, ओंकार कदम, साहिल शिर्के, शुभम जाधव, नितीन शिगवण, गोट्या मोरे, विक्रम घाणेकर, राहूल भोसले, सिध्देश रहाटे, जितेंद्र कांबळे, समीर कदम, तुषार चव्हाण, विनीत शिंदे, राहूल गुरव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.