मोहन भागवत यांना दहशतवादी म्हटल्याप्रकरणी गायिकेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

71

सामना ऑनलाईन । मुंबई

सरसंघचालक मोहन भागवत यांना दहशतवादी म्हटल्याप्रकरणी गायिका हार्ड कौर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुण कौर ढिल्लन उर्फ हार्ड कौरने 18 जूनला तिच्या इंस्टाग्रामवर मोहन भागवत व योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दात पोस्ट शेअर केल्या होत्या.

हार्ड कौर विरोधात शिशांक त्रिपाठी या वकिलाने वाराणसीच्या कॅन्ट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. हार्ड कौर हिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मोहन भागवत यांना दहशतवादी म्हटले होते व देशातील सर्व दहशतवादी हल्ल्यांना ते जबाबदार असल्याची टीका केली होती. तसेच यासोबत तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बलात्कारी म्हटले होते.

या प्रकरणी तिच्या विरोधात देशद्रोह, धार्मिक भावना दुखावणे, अब्रुनुकसानी, सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या