भवतालचे बीजगोळे

मेधा पालकर

बीजगोळे म्हणजे मातोचे छोटे छोटे गोळे करून त्यामध्ये देशी वनस्तींच्या बिया घालणे. त्या गोळ्याला राख, हळद, कावाचे आवरण देण्यात येते. ‘भवताल’ या संस्थेने बीजगोळे रोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना हे बीजगोळे देण्यात येणार आहेत. वारकरी पालखी मार्गावर ‘ज्ञानोबा, तुकोबांच्या’ जयघोषात बीजगोळे टाकतील. बीजगोळ्यावर जेव्हा पावसाचा शिडकावा होईल आणि ते जमिनीत रुजेल तेव्हा नक्कीच वृक्षसंवर्धनाचा हेतू साध्य होईल.

‘बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात…’

कवी मधुकर आरकडे यांच्या गीताच्या ओळी पावसाळ्याची चाहूल करून देतात आणि त्याचवेळी पावसाळ्यात निसर्गात टाकलेले बी रुजते याची पण जाणीव करून देतात. झाडाफुलांवर मनसोक्त विहार करणारे पक्षी फळे खाऊन त्यांच्या बिया निसर्गात टाकतात, त्यातून नवीन वनस्पती अस्तित्वात येतात. पण माणसाने गेल्या काही वर्षात केलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे हक्काचे ठिकाण त्यांना मिळेनासे झाले आहे. फळझाडेही रस्त्याने दिसत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांनी त्या फळबिया टाकल्यानंतर त्यामधून होणारी नैसर्गिक वृक्षलागवड कमी होताना दिसते आहे. यावर उपाय म्हणून भवताल संघटनेने ‘बीजगाळे’ तयार केले आहेत.

हवा, पाणी, पर्यावरण याची काळजी घेण्याचे काम भवताल ही संघटना करते. पावसाळा आला की, वृक्षलागवड, वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरू होतात. पण पुढे ती झाडे जगविण्याकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. हीच उदासीनता दूर करण्यासाठी भवताल संस्थेने बीजगोळे तयार करण्याची संकल्पना राबविली. बीजगोळे म्हणजे नक्की काय असा प्रश्न पडू शकतो. यामध्ये कुसुम, खैर, आपटा, सीताफळ, बहवा, चंदन, रिठा, करांज, शिरीष, जांभूळ आदी देशी झाडांच्या बियांचे गट करण्यात येतात. मातोचे छोटे छोटे गोळे करून त्यामध्ये वरील देशी वनस्तींच्या बिया घालण्यात आल्या. त्यानंतर त्या गोळय़ाला राख, हळद, कावाचे आवरण देण्यात आले. बघता बघता हजारो बीजगोळे तयार झाले. आता पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणाऱया पालख्यांमध्ये सहभागी होणाऱया वारकऱयांना हे बीजगोळे देण्यात येणार आहेत. वारकरी बीजगोळे पालखी मार्गावर ‘ज्ञानोबा, तुकोबांच्या’ जयघोषात टाकणार आहेत. बीजगोळय़ावर जेव्हा पावसाचा शिडकावा होईल आणि ते जमिनीत रुजेल तेव्हा वृक्षसंवर्धनाचा हेतू साध्य होईल.

वारकरी हे बीजगोळे टाकत असताना यातील किती बीजगोळे जमिनीत रुजतील, त्यातून किती वृक्ष तयार होतील हे जरी आता सांगणे शक्य नसले, तरी ही संकल्पना मांडून त्यामध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसाला हातभार लागला हे फार महत्त्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान किती महत्त्वाचे आहे याची जाणीव या उपक्रमाने प्रत्येकाला करून दिली आहे. इतकेच नाही तर घरी आणलेल्या फळांच्या बिया अशाच साठवून घरच्या घरी असे बीजगोळे तयार करून ते मोकळ्या जमिनीवर टाकण्यासाठी पर्यावरणप्रेमी प्रयत्न करतील. दरवर्षी येणाऱ्या जून महिन्यापूर्वीच असे बीजगोळे तयार करण्याची तयारी प्रत्येकाची होईल. एका चांगल्या उपक्रमाचे सर्वांनीच स्वागत केले आहे. प्रत्येकाचा सहभाग अशा उपक्रमात उत्स्फूर्तरीत्या वाढला तर वृक्षतोडीमुळे येऊ घातलेल्या जागतिक तापमानवाढीसारख्या संकटांवर नक्कीच मात करता येईल.

वृक्षारोपण मोहिमेत ‘खारीचा वाटा’
महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात १ ते ७ जुलै या काळात चार कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेतील लोकांचा सहभाग म्हणून पाच हजार बीजगोळे (सीड बॉल्स) देण्यात येणार आहेत. हा या मोहिमेतील खारीचा वाटा असेल, असे अभिजित घोरपडे यांनी सांगितले. काही बीजगोळे ट्रेकर्स, निसर्गात भटकंती करणारे लोक, कारकरी यांना देण्यात येणार आहेत. याशिवाय काही बीजगोळे प्रयोगाकरिता वापरण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या