‘बेसबॉल’साठी निवड चाचणी

सामना ऑनलाईन, मुंबई –

अमरावती येथे १० ते १३ मार्च या कालावधीत होणाऱया राज्यस्तरीय बेसबॉल सीनियर पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्हा बेसबॉल असोसिएशनतर्फे गुरुवारीं ९ मार्चला अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी होणार आहे. संत रामदास मैदान, अंधेरी पश्चिम, भरडावाडी (आंबोली), नवरंग सिनेमाजवळ सकाळी ९ वाजता अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी घेतली जाणार आहे. यातून निवडलेला संघ अमरावती येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होईल. अधिक माहितीसाठी सचिव राजेंद्र इखनकर यांच्याशी संपर्क साधावा.

आपली प्रतिक्रिया द्या