सेलूत कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

644

सेलू येथील कै. वामनराव कदम बोर्डीकर कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. कानिफनाथ परसराम धोंडे (21, रा. आष्टा हरिनारायण ता. आष्टी. जी. बीड) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेलू येथील कृषी महाविद्यालयात अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कानिफनाथ परसराम धोंडे या विद्यार्थ्याने बुधवारी सेलू परभणी रस्त्यावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना सकाळी 7 वाजता उघडकीस आली. सदरिल विद्यार्थ्याच्या खिशात मोबाईल व चिठ्ठया आढळुन आल्या याद्वारे आई-वडील व इतरांना मनातील भावना बोलून दाखवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्याचे समजते.

मोबाईलद्वारे बुधवारी पहाटे 4.30 वाजता संदेश पाठविण्यात आल्याचे समजते. आत्महत्याचे कोणतेही कारण स्पष्ट होत नसल्याची माहीती पोलिसांनी दिली. त्यामुळे सेलू पोलीस ठाण्यात घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालायत उत्तरीय तपासणी करुन पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेचा तपास पोलिस उपनिरिक्षक विजय रामोड, पोलिस कर्मचारी संजय साळवे, रवी मगरे हे करत आहेत.

गुणवान विद्यार्थी -प्राचार्य एस. एस. राऊत
कृषी महाविद्यालयात अंतीम वर्षात शिक्षण घेणारा कानिफनाथ धोंड? हा विद्यार्थी गुणवान होता अभ्यासात हुशार व वर्तणूक चांगली होती. यामुळे आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय का? घेतला असावा? हा प्रश्न अनुत्तरित आहे. शहरातील शंभु नगर परिसरात खोली करुन राहणारा विद्यार्थी, कृषी महाविद्यालयात नियमितपणे उपस्थित राहत होता. मंगळवारी तो महाविद्यालयात उपस्थित असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस. राऊत यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यासमोर कुठलीही समस्या उभी राहीली तर त्यांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेवू नये, असे अवाहन देखील प्राचार्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या