परराज्यातील ‘त्या’ कामगारांना परत पाठवा, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सूचना

998

थ्री एम पेपर मिल कंपनीने 47 कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यात यावे, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात कंपनीने परराज्यातून 47 कामगार आणल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाची आताची संख्या, तसेच बरे झालेले रुग्ण या सगळ्यांचा विचार करता जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण राखण्यात यश मिळविले आहे, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हाधिकारी सभागृह येथे कोविड 19 प्रादुर्भाव व त्याअनुंषगाने केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्र. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एन.एस. माने, प्र. जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार राजन साळवी यांनी यावेळी एका वंâपनीत विनापरवानगी आलेल्या 47 कामगारांचा मुद्दा मांडला असता या सर्वांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यात यावे, अशा सूचना देसाई यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांबाबत, रुग्णालयातील औषधांची उपलब्धता, इमर्जन्सीसाठी बेड, ऑक्सिजनचा पुरवठा आदींबाबतचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या