ज्येष्ठ आंबेडकरी अभ्यासक कुमुद पावडे यांचे निधन

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या कुमुद पावडे (85) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुमुद यांच्या पार्थिवावर उद्या, गुरुवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

लहानपणापासूनच  कुमुद पावडे यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. ज्या काळात कमालीची अस्पृश्यता पाळली जात होती. त्याकाळात त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. इतकेच नव्हे तर संस्कृत विद्वान म्हणून मान्यता मिळवली. त्या शासकीय महाविद्यालय, अमरावती येथील संस्कृत विभागाच्या प्रमुख तसेच राष्ट्रीय दलित महिला महासंघाच्या संस्थापक सदस्य होत्या. वयाच्या 21 व्या वर्षापासून रात्रशाळेतून त्यांनी विनावेतन शिक्षणदानाचे कार्य सुरू केले. स्त्राrमुक्ती व दलित स्त्र्ायांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले. विविध पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता.