काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन

काँग्रेसचे महासचिव आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते.

राजीव सातव यांना 19 एप्रिल रोजी कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. 23 एप्रिल रोजी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 25 एप्रिल पर्यंत त्यांची प्रकृती चांगली होती उपचारांना प्रतिसाद देत होते मात्र त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर व्हेंटिलेटरद्वारे उपचार सुरू होते.

काँग्रेस नेते राजीव सातव व्हेंटीलेटरवर, प्रकृती मात्र स्थिर

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या निधनावर दुख व्यक्त केले आहे. ‘राजीव सातव यांच्या निधनाने मी दुखी झालो आहे. ते एक प्रतिभावंत नेते होते. आमच्या सर्वांसाठी ही मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत’, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत भावूक शब्दात राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘निशब्द… आज माझ्यासाठी, तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी काळा दिवस आहे. माझा मित्र माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली. काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त!’, असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी देखील ट्विटरवरून राजीव सातव यांना श्रद्दांजली वाहिली आहे.’निशब्द! आज एक असा साथिदार गमावला ज्याने सार्वजनिक जीवनातला पहिलं पाऊल युवा काँग्रेसमध्ये माझ्यासोबत ठेवले होते आणि आज पर्यंत सोबत चाललो पण आज… राजीव सातव यांचा साधेपणा, त्यांचे निखळ हसणे, जमिनीशी जोडलेले त्यांचे नाते, नेतृत्व, पक्षनिष्ठा आणि मैत्री कायम स्मरणात राहील. अलविदा माझ्या मित्रा… जिथे असशील तिथे चमकत रहा” असे ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे.

राजीव सातव यांच्या निधनावर मान्यवरांनी केला शोक व्यक्त

 

आपली प्रतिक्रिया द्या