आई शप्पथ! शेअर बाजार 50 हजाराच्या पार, बायडन यांच्या शपथेनंतर ऐतिहासिक उसळी

मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी जोरदार उसळी घेत 50 हजाराचा टप्पा पार केला आहे. शेअर बाजारातील आजची झेप ऐतिहासिक ठरली असून पहिल्यांदाच शेअर बाजाराने एवढा मोठा आकडा पार केला आहे. गुरुवारी शेअर बाजार निर्देशांक 50,096.57 वर आणि निफ्टी 14730 वर खुला झाला.

अमेरिकेत जो बायडन यांनी बुधवारी 46वें राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यासोबतच अमेरिकेत बायडन पर्वाची सुरुवात झाली. या सत्ता परिवर्तनाचे पडसाद जगभरात पाहायला मिळाले. बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर ट्रंपच्या अनेक निर्णय, धोरणांमध्ये बदल केला आणि ऐतिहासिक पाऊलं उचलली आहेत. यामुळे हिंदुस्थानातील गुंतवणूकदार उत्साहात आहे, असे जाणकारांचे मत आहे.

बुधवारीही पाहायला मिळाली तेजी

आठवड्याचा तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजार चांगल्या स्थितीत बंद झाला. बाजाराची सुरुवात 110 अंकांनी वधारून 49,508.79 वर खुला झाला आणि सकाळी 10 वाजता 209 अंकांची झेप घेतल 49,607.15 वर पोहोचला होता. बुधवारी बाजार 393.83 अंकांनी वधारून 49,792.12 वर बंद झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या