शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स 1,000 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी चांगली ठरली नाही. शेअर बाजारात सोमवारी 1% पेक्षा जास्तची घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेच्या पतनाने ही पडझड पाहायला मिळत आहे. दुपारी सव्वादोन पर्यंत मुंबई शेअर बाजार 1.4% नी घसरून 58,309.51 वर पोहोचला.

दरम्यान, यूएस अधिकाऱ्यांनी रविवारी सिलिकॉन व्हॅली बँकेच्या (SVB) पतनाचा होणारा परिणाम रोखण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या. यानंतर संसर्गाची भीती कमी झाली.

विश्लेषकांना SVB संकटाचा देशांतर्गत आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होण्याची अपेक्षा नाही.

SVB संकटाचा देशातील बँकिंगवर जवळपास शून्य परिणाम झाला आहे, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही.के. विजयकुमार यांनी सांगितले की, यामुळे बाजारपेठेत फार काळ गोंधळ होण्याची शक्यता नाही.

खासगी बँकेच्या क्षेत्रात 2.1% घसरले, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका 2.3% घसरल्या. ऑटो कंपन्यांचे 2.2% नुकसान झाले.

तर हिंदुस्थानी आयटी सेवा देणारी टेक महिंद्राने 10% पेक्षा जास्त झेप घेतली.