#corona शेअर बाजारावर कोरोनाचा कहर, सेन्सेक्स दोन हजारांनी घसरला

1434

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही कायम असून सोमवारी सेन्सेक्स पुन्हा 2015 अंकांनी कोसळला आहे.  सोमवारी शेअर बाजार उघडताच ही पडझड झाली.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्सही 1 हजार अंकांनी कोसळत 33,103.24 वर सुरू झाला. तसंच नॅशनल स्टॉक एक्सेंजचा निफ्टीही 9,587.80 वर सुरू झाला. पण थोड्याच वेळात सेन्सेक्स तब्बल 1700हून अधिक अंकांनी घसरला आणि 32262वर पोहोचला. सकाळी 9.34 पर्यंत हा आकडा 2036 अंकांवर घसरला.

गेल्या आठवड्याभरात ही पडझड सुरूच असल्याचं चित्र आहे. कोरोना वायरस आणि येस बँकेच्या प्रकरणामुळे गेल्या सोमवारी शेअर बाजाराला मोठा फटका बसला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या