
भारतीय शेअर बाजार सोमवारी उसळला. सेन्सेक्स 256 अंकांने वधारून 82,445 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 100 अंकांच्या वाढीसोबत 25,103 अंकांवर बंद झाला. इंडसइंड बँक, मारुती, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, ऑक्सिस बँक, बजाज फिनसर्व आणि एनटीपीसीचे शेअर्स वाढले. तर इटर्नल, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील आणि भारती एअरटेलचे शेअर्स घसरले.



























































