संसदेत पॉर्न पाहताना खासदाराला रंगेहाथ पकडले, उडाला गोंधळ

Serbia

संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर, जिथे नागरिकांचे प्रश्न मांडले जातात, देशाच्या प्रगतीची दिशा ठरते. मात्र सर्बियात वेगळंच घडलं. सर्बियन खासदाराचा सदनात पॉर्न पाहण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गदारोळ झाला होता. संसद टीव्ही वाहिनीच्या प्रसारणादरम्यान खासदाराची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली. यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. याप्रकरणी खासदाराच्या एका सहकाऱ्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सर्बियन खासदाराचा सदनात पॉर्न पाहण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गदारोळ झाला होता. संसद टीव्ही वाहिनीच्या प्रसारणादरम्यान खासदाराची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली. यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. याप्रकरणी खासदाराच्या एका सहकाऱ्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मात्र, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, ब्रिटीश खासदार नील पॅरिश यांना सदनात त्यांच्या फोनवर दोनदा अश्लील व्हिडीओ पाहताना पकडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. घटना सार्वजनिक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पॅरिश यांनी आपली चूक देखील कबुल केली होती.