टेनिस स्टार सेरेना विलियम्स आई होणार

49
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क
तब्बल २३ ग्रँडस्लॅम जिंकणारी टेनिस स्टार सेरेना विलियम्स हिच्याकडे गोड बातमी असून ती आई होणार आहे. पस्तीस वर्षीय सेरेनाने स्नॅपचॅटवर तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. स्नॅपचॅटवर तिने एक पोस्ट टाकली आहे. यात सेरेनाने पिवळ्या रंगाचा स्वीमसूट घातला असून ती आरश्यासमोर उभी आहे. फोटो खाली २० आठवडे ही ओळ तीने लिहिली आहे. फोटोत सेरेना गर्भवती असल्याचे दिसत आहे.
सेरेनाच्या या पोस्टनंतर जगभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान चाहत्यांचे आभार मानल्यानंतर सेरेनाने ही पोस्ट संकेतस्थळावरुन हटवली आहे.
सेरेनाने सोशल मिडियावरच रेडि्डटचा सहसंस्थापक एलेक्सिस ओहानियान याच्याबरोबर साखरपुडा झाल्याची बातमी  दिली होती.
सेरेनाच्या आधीची बेल्जियमची टेनिस स्टार किम क्लिस्टर्स हिने देखील मुलाला जन्म देण्यासाठी काही काळापुरते टेनिस खेळणे थांबवले होते. २००९ ला तीने टेनिसमध्ये पुन्हा पदार्पण केले आणि अनेक पुरस्कार जिंकले. ती सुपरमॉम म्हणूनही ओळखली जाते. बेलारुसची टेनिस खेळाडू व्हिक्टोरिया अजारेंका हिनेदेखील गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये एका मुलाला जन्म दिला असून जुलै महिन्यात ती पुन्हा टेनिस खेळायला सुरुवात करणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या