पत्नीने दिला धोका, सायको किलरने 18 महिलांचा काढला काटा; सीरियल किलरला अटक

हैद्राबाद पोलिसांनी कुख्यात सीरियल किलर मैना रामुलू याला अटक केली आहे. मैना रामुलूवर 16 जणांची हत्या केल्याचा आरोप असून हैद्राबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत या सायको किलरला अटक केल्याची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरियल किलर मैना रामुलू याची पत्नी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्यापासून तो महिलांना लक्ष्य करत होता. आतापर्यंत त्याने 18 महिलांच्या हत्या केल्या आहेत. मूळचा संगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी असलेला मैना रामुलू याला आतापर्यंत 21 वेळा अटक झाली असून एकदा दोषीही ठरवण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात झाली होती.

दोन वर्षांपूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. यानंतरही त्याने हत्यांचे सत्र सुरुच ठेवले. आरोपी मैनाने घाटकेसर आणि मुदगुल पोलीस स्थानक भागात दोन महिलांची हत्या केली. या हत्यांप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होती. अखेर त्याला अटक करण्यात यश आले आहे.

पत्नीने दिला धोका

आरोपी मैना रामुलू याची पत्नी परपुरुषासोबत पळून गेली होती. तेव्हापासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले. 2011 मध्ये त्याला वेड्यांच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र तिथूनही तो फरार झाला आणि सीरियल किलर बनला. 2013 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. पाच वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर 2018 मध्ये त्याची सुटका झाली.

एकट्या महिलांना गाठायचा

आरोपी एकट्या महिलांना गाठून त्यांची हत्या करत होता. दारूच्या गुत्त्यावर येणाऱ्या महिलांना पैशाचे आमिष दाखवून शारिरीक संबंधांसाठी तो राजी करायचा. कार्यभाग उरकल्यानंतर तो महिलेची गळा दाबून हत्या करायचा आणि मौल्यवान वस्तू चोरून फरार व्हायचा.

आपली प्रतिक्रिया द्या