नवाब मलिक यांच्या प्रकृतीसंबंधी मेडिकल बोर्ड स्थापन करा; ईडीची विशेष न्यायालयाला विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी मेडिकल बोर्ड स्थापन करण्यात यावे, अशी विनंती ईडीने विशेष न्यायालयात केली आहे. मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना ईडीने या विनंतीचा अर्ज दाखल केला. मलिक हे मागील चार महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

गेल्या महिन्यात त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार होत्या, मात्र यादरम्यान ते अनफिट आढळल्याने त्या चाचण्या होऊ शकल्या नाहीत. खासगी रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल वेळोवेळी विशेष न्यायालयासमोर सादर केला आहे.