गडचिरोलीत सात जणांची कोरोनावर मात, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत दवाखान्यातून घराकडे रवानगी

578

गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जिल्हयातील आणखी सात कोविड-19 बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यावेळी टाळयांच्या गजरात त्यांना सर्व उपस्थितांनी प्रोत्साहन दिले. घरी सोडण्यात आलेले सातही जण एटापल्ली तालुक्यातील आहेत.

गुरूवारी सात जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे जिल्हयातील एकुण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 19 झाली. तर सध्या 19 कोरोना बाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. एक जणाचा यापुर्वी 1 जून रोजी हैद्राबाद येथे कोरोना निदान व दुदैवी मृत्यू झाला आहे. सात जणांना दवाखान्यातून डिस्चार्ज देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, अतिरीक्त  जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री उपस्थित होते.

गडचिरोलीत मुंबई येथून आलेल्या अजून  एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे  गडचिरोलीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 40  वर पोहोचली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या