मराठवाड्यातील महसूल कर्मचारी त्रस्त, कुणी देणार का लक्ष ?

63

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा विभागावर राज्यत्र्यांकडून नेहमीच अन्याय झालेला आहे. याचा परिणाम विकासाचा अनुशेष वाढत गेला. विकासाच्या बाबतीत इतर प्रदेशांच्या तुलनेत मराठवाडा मागे राहिला. आजही चित्र बदलले नाही. विकासाच्या अनुशेषाबरोबरच महसूलच्या मनुष्यबळाचा प्रश्न सुटू शकलेला नाही, आजमितीला मराठवाड्यातील महसूलची सातशेवर पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी सरकारकडून कुठलीही पावले उचलली जात नाहीत, हीच मोठी शोकांतिका आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रल्हाद कचरे हे महसूल उपायुक्तपदावरून सेवानिवृत्त झाले असताना अद्याप हे पद भरले गेले नाही.

काही वर्षांपासून मराठवाड्यावर दुष्काळ आणि आपत्तीचे ढग कायम आहे. महसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमीत कामकाजाशिवाय विविध आपत्तीची कामे, त्याबाबतचे पंचनामे, अहवाल आदी कामे करावी लागतात. रिक्त पदांवर भरती न झाल्यामुळे एकाच अधिकाऱ्याला विविध पदांची जबाबदारी सांभाळावी लागते. कर्मचाऱ्यांचीही अशीच अवस्था असल्यामुळे कार्यालयीन कामकाजाचा वेग मंदावल्याचे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे.

महसूल विभागात लिपिक, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, वाहनचालक, शिपाई आदी कर्मचाऱ्यांची पदे तसेच नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आदी अधिकारीवर्गाची पदे भरली जातात. मात्र, काही वर्षांपासून या पदांसाठी नोकरभरती झालेली नाही तर दुसरीकडे दरवर्षी विविध संवर्गातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. हीसुद्धा पदे अद्याप रिक्त आहेत. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. सेवानिवृत्ती तसेच वाढत्या कामाच्या ताणामुळे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी कंत्राटी पदे भरून वेळ मारून नेली जात आहे. कंत्राटी पदांचे हे चॉकलेट देऊन तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार सध्या मराठवाडा विभागात सुरू आहे. हे कर्मचारी सेवेत कायम नसल्याने कामकाज करताना म्हणावा तसा प्रभाव पाडताना दिसत नाही.

मराठवाड्यातील महसूल विभागात लिपिक, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, वाहनचालक, शिपाई आदी कर्मचाऱ्यांची पदे आहेत. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजाबारोच विकासाच्या कामावर होत आहे. ही प्रत्यक्ष काम करणारी मंडळी आहे. नियोजन आणि अंबलबजावणीसाठी मार्गदर्शन करणारी अनेक महत्त्वाचे पदे विभागात रिक्त आहेत. मराठवाड्यात नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आदी अधिकारीवर्गाची अनेक पदे भरली जातात. मात्र, काही वर्षांपासून या पदांसाठी नोकरभरती झालेली नाही. शिवाय रिक्त पदांवर शासनाने अन्य ठिकाणच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही.

विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने प्रशासनाच्या कामाची गतीही संथ झालेली आहे. ही गती वाढविण्यासाठी आधुनिकतेची जाण असलेल्या तरुणांची गरज निर्माण झालेली आहे. परंतु ही पदे कायमस्वरूपी भरली जात नाहीत, कंत्राटी पद्धतीने पदे भरून काम भागवले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी तत्त्वावर पदे भरलेली आहेत. ही कंत्राटी पद्धतीने पदे भरली जातात. सक्षम अधिकाऱ्यांची वाणवा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या