तिनं चहा उकळला पण बनलं विष; एकाच कुटुंबातील 7 जण बेशुद्ध

फाईल फोटो

जम्मू कश्मीरच्या शोपियामध्ये वनौषधी टाकलेला चहा (अमृततुल्य) प्यायल्याने एकाच कुटुंबातील सात लोक बेशुद्ध पडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शोपियाच्या नबल जवूरा भागातील एका कुटुंबात ही घटना घडली. कुटुंबातील एका मुलीने वनौषधी ‘आर्जेमोन मेक्सिकाना’ वाटून चहामध्ये उकळली. हा चहा प्यायल्याने घरातील सात जण बेशुद्ध पडले.

चहा प्यायल्यानंतर काही वेळातच ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना शोपियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तिथून पुढे त्यांना श्रीनगरला हलवण्यात आलं. श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींची नावं आझाद अहमद, हजीरा बेगम, मोहम्मद अमीन, फरीदा जान, शाबिर अहमद अशी आहेत तर अन्य दोनजण अल्पवयीन आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या