मध्यवर्ती कारागृहातून सात मोबाईल जप्त

64
प्रातिनिधीक फोटो

नाशिक, (सा.वा.)

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील शौचालयात जमिनीत पुरलेले सात मोबाईल फोन आढळले असून, अज्ञात कैद्यांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने कारागृहातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

कारागृहातील मंडल क्रमांक ७ मधील यार्ड क्रमांक ४च्या बॅरेक ३मध्ये काल सायंकाळी हे मोबाईल सापडले. येथील शौचालयाच्या बाजूला जमिनीच्या फरशीखाली सीमकार्ड नसलेले सात मोबाईल फोन लपवून ठेवलेले होते. हे बेवारस फोन जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत सुमारे पाच हजारांच्या घरात आहे. याप्रकरणी तुरुंगाधिकारी सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या