चापोलीत डेंगयूने सात महिन्याचा मुलीचा मृत्यू

चापोली येथील विद्या मंगेश शिंदे या सात महिन्याच्या बाळाचा रविवारी डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सध्या गावात मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव वाढला असून त्यामुळे साथीचे आजार फैलावत आहेत. विद्याला काही दिवसांपासून ताप वाढत होता. चाकूर येथील एका खाजगी दवाखान्यात तपासणी केली असता तेथे डेंग्यूचे लक्षण आढळून आले. काही दिवस उपचार केल्यानंतर पुढील उपचटारासाठी लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या गावात मोठ्या प्रमाणात साथीचे रोग फैलावत असल्याने रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या