प्रसृतीसाठी गरोदर महिलेला नेत होते रुग्णालयात, भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू

कर्नाटकात एका गरोदर महिलेला प्रसृती कळा सुरू झाल्या म्हणून कुटुंबीय तिला रुग्णायलयात नेत होते. पण रस्त्यातच त्यांचा भीषण अपघात झाला आणि गरोदर महिलेसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात इरफाना बेगम ही 25 वर्षीय महिला गरोदर होती. तिला प्रसृती कळा सुरू झाल्या म्हणून तिच्या कुटुंबीय गाडीतून तिला रुग्णालयात नेत होते. तेव्हा गाडीचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यात इरफानासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती हे आलंद गावचे रहिवासी होते.

आपली प्रतिक्रिया द्या